Home अकोले अकोले: आता डाव्यासह उजव्या कालव्यालाही पाणी

अकोले: आता डाव्यासह उजव्या कालव्यालाही पाणी

Breaking News | Akole: ८४ किलोमीटर असलेल्या या उजव्या कालव्याचा लाभ अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यातील ६९ गावांना होणार. ( Nilwande right canal).

Now water to left as well as Nilwande right canal

अकोले: सोमवारी राम लोकार्पण सोहळ्याच्या मुहूर्तावर  ऊर्ध्व प्रवरा निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली.

८४ किलोमीटर असलेल्या या उजव्या कालव्याचा लाभ अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यातील ६९ गावांना होणार आहे. डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्यांवरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या पुढाकाराने वरच्या भागातील कालव्यांच्या कामांना सुरुवात झाल्यामुळेच पाणी शेवटच्या गावाला मिळण्यात यश आले असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील म्हणाले.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आता पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. उजव्या कालव्यातून दीड टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगत यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे व जलस्रोतांना एक नवसंजीवनी मिळणार असल्याचेही पालकमंत्री विखे यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कडर्डीले, माजी आमदार वैभव पिचड यांचीही भाषणे झाली. यावेळी पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Now water to left as well as Nilwande right canal

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here