Home अकोले नुपुर शर्मा आक्षेपार्ह वक्तव्य, कोतुळ येथे दोन गटात सामाजिक तणाव, कडकडीत बंद

नुपुर शर्मा आक्षेपार्ह वक्तव्य, कोतुळ येथे दोन गटात सामाजिक तणाव, कडकडीत बंद

Nupur Sharma offensive statement, social tension in two groups at Kotul News today

Akole | Kotul News | अकोले: मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नुपुर शर्मा (Nupur Sharma offensive statement) यांचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडिया त टाकणाऱ्या व स्वतःचे स्टेटसला ठेवण्याच्या प्रकारावरून कोतुळ येथे दोन गटात आज सामाजिक तणाव निर्माण झाला यावरून आज दिवसभर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याच्या प्रकारातून अकोले तालुक्यातील कोतुळ येथे दोन गटात जातीय तणाव निर्माण झाला शनिवारी रात्री हा प्रकार घडला

भाजपा च्या नूपुर शर्मा यांचे समर्थन करण्याच्या पोस्ट सोशल मीडियात टाकल्या वरून मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी या तरुणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशा मागणी चा तगादा पोलिसांकडे लावला यावरून सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या कारणाने या समाजाचे अकोले, संगमनेर ,राजुर, श्रीरामपूर ,नगर या भागातून अनेक कार्यकर्त्यांचा जमाव अकोले व कोतुळ येथे जमा झाला अखेर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चार तरुणांवर अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर रात्री रात्री उशिरा पर्यंत दोन्ही गटांकडून जमाव वाढत असल्याचे लक्षात आल्याने जिल्ह्यातून मोठा पोलिस फौज फाटा अकोल्यात पाठविला

जातीय तणावातून कोतुळ येथे रविवारी सकाळी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या चार तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले गुन्हा दाखल झाल्यानंतर वातावरण अधिक संतप्त होत गेले.  

रविवारी या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गावात मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला गावात स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला व्यावसायिकांनी सायंकाळपर्यंत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले

अकोले पोलीस स्टेशनचे पोलीसनिरीक्षक मिथुन घुगे यांनी कोतुळ येथे भेट देत स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेत ली यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपादयक्ष सिताराम देशमुख प्रदीप भाटे, विनोद देशमुख सचिन गीते विनय समुद्र गणेश पोखरकर आदी उपस्थिती होते यावेळी श्री घुगे म्हणाले की कोतुळ ग्रामपंचायत ने गावात सीसी टी व्ही कॅमेरे बसविले त्याचा चांगला उपयोग झाला यामुळे सोयाबीन चोरीसारखे गुन्हे उघड होण्यास मदत झाली कोतुळ गावचे पोलीस स्टेशनचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविणार असून लवकरच दोन्ही समाजाचें प्रमुख लोकांना एकत्र घेऊन शांतता कमिटीची बैठक घेण्यात येईल रात्री गावात उशिरापर्यंत मोकाट फिरणाऱ्या लोकांचा बंदोबस्त करू कोणीही कायदा हातात घेऊ नका याबाबत प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे

गेल्या वर्षभरात अकोले तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली मात्र याला कोणी गालबोट लावत असेल तर प्रसंगी प्रशासन कठोर भूमिका घेईल असा इशारा प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिला.

Web Title: Nupur Sharma offensive statement, social tension in two groups at Kotul News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here