Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

Two-wheeler hit by unknown vehicle on Pune-Nashik highway

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहूली येथील एकल घाट परीसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत (hit) एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक २० जून रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गणेश दत्तू शिंदे हे  (हिवरखेडे ता,-चांदवड, जिल्हा नाशिक.) येथील रहिवासी असुन ते त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच १२ पि एम ०८९९  हिच्या वरून पुण्याच्या दिशेने चालले होते. सोमवारी दुपारी ते माहूली परीसरातील एकल घाटात आले असता. अज्ञात वाहणाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात शिंदे हे गंभीर जखमी झाले. तर यावेळी आजुबाजुच्या नागरीकांसह प्रवाशांनी आपली वाहने थांबवत जखमीला मदत केली व खाजगी रुग्णवाहिकेतून त्यांना संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Two-wheeler hit by unknown vehicle on Pune-Nashik highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here