Home क्राईम लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या परिचारिकेची प्रियकरानेच केली हत्या

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या परिचारिकेची प्रियकरानेच केली हत्या

Murder News: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या परिचारिकेची प्रियकरानेच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

nurse living in a live-in relationship was Murder by her boyfriend

मुंबई : मुंबईला लागून असलेल्या पालघरच्या तुळींज परिसरात प्रेयसीच्या खून प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. प्रेयसी मेघाच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी आरोपी हार्दिकने तिच्या (मेघाच्या) बहिणीला मेसेज करून ही माहिती दिली होती.

हार्दिकने व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये लिहिलं होतं की, मेघाशी आता बोलता येणार नाही, कारण मी तिची हत्या केली. मेघाने माझं आयुष्य नरक बनवलं होतं. तुम्हाला मृतदेह हवा असेल तर मी पत्ता पाठवतो आणि हो.. मला आता जगायचं नाही. त्यामुळे पोलिस मला पकडण्यापूर्वीच मी मरणार आहे.” मात्र, पोलिसांनी हार्दिकला नागदा येथे अटक केली.

विशेष म्हणजे पालघरमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह पलंगावर लपवून ठेवला आणि नंतर रेल्वेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी हार्दिकला ट्रेनमधून अटक केली. दोघेही पालघरमधील तुळींज भागातील एका घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक काहीही काम करत नव्हता. अशा परिस्थितीत मेघाच्या कमाईतून घराचा खर्च चालायचा. व्यवसायाने परिचारिका असलेल्या मेघा आणि हार्दिकमध्ये वारंवार भांडणे होत होती. या भांडणातून एके दिवशी हार्दिकने मेघाची हत्या करून तिचा मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला आणि घरातील काही वस्तू विकून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Web Title: nurse living in a live-in relationship was Murder by her boyfriend

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here