Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

अहमदनगर ब्रेकिंग: जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Ahmednagar Breaking: स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अनिल कटके (Photo Anil Katake), दौलतराव जाधव, बाजीराव पोवार, सुनील पाटील यांची बदली करण्यात आली आहे.

Transfer of four police inspectors in Ahmednagar

अहमदनगर: जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकाच्या बदल्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक अनिल कटके, दौलतराव जाधव, बाजीराव पोवार, सुनील पाटील यांची बदली करण्यात आली आहे, तसे आदेश त्यांनी काढले आहेत.

या चार पोलीस निरीक्षकांना शिवजयंती बंदोबस्तानंतर तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कटके यांची जळगाव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची नाशिक ग्रामीण, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची धुळे तर सुनील पाटील यांची नाशिक ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.

Web Title: Transfer of four police inspectors in Ahmednagar

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here