Home अकोले अकोले शहरातील हॉटेल आणि कॅफेमध्ये अश्लील चाळे, हॉटेलवर धडक कारवाई

अकोले शहरातील हॉटेल आणि कॅफेमध्ये अश्लील चाळे, हॉटेलवर धडक कारवाई

Akole Crime:  हॉटेल आणि कॅफेमध्ये अश्लील चाळे करताना महाविद्यालयातील तरुण तरूणी आढळून आल्याने हॉटेल पायल, पुजा आणि कॅन्डल कॅफेवर पोलिसांनी कारवाई (raid) केल्याने परिसरात खळबळ.

Obscene chala in hotel and cafe in Akole city, raid on hotel

अकोले: शहरातील हॉटेल आणि कॅफेमध्ये अश्लील चाळे करताना महाविद्यालयातील तरुण तरूणी आढळून आल्याने हॉटेल पायल, पुजा आणि कॅन्डल कॅफेवर पोलिसांनी कारवाई केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अकोले शहराचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी धडक कारवाई केली आहे.

शहरात काही हॉटेल चालकांनी ग्राहकवर्ग म्हणून फक्त तरुणाईलाच डोळ्यासमोर ठेवून हॉटेल, कॅफेंची रचना केली आहे. त्यामुळे हा ट्रेंड तरुणाईस आकर्षित करीत आहे. तर या हाँटेल आणि कॅफेच्या आतून जाता येईल असा एक दरवाजा असलेली केबीन आहे. या केबिनमध्येच सर्व आंबट चाळे होत असतात.

पैसा कमविण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा काही नियम नाही. हॉटेलच्या काऊंडरवर बसून आपली बहिन, मुलगी किंवा नातीच्या वयात असणाऱ्या शालेय तरुण-तरुणांना अश्लिल काही व्यक्ती अकोले शहरात धंदा मांडून बसले आहेत. आंबट चाळे करणाऱ्यांची वेटिंग असते, त्यात आकर्षक अंतर्गत सजावट, चविष्ट खाद्यपदार्थांसह जोडप्यांना सुरक्षितता एकांतवास देण्यास प्राधान्य दिल्याचे दिसते. याबाबत अनेक वेळा माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी थेट काही हॉटेल आणि कॅफे यांच्यावर छापे टाकले आहेत. यात अकोले शहरात अगदी बाजार तळाच्या समोर असणाऱ्या पायल हॉटेलवर छापा टाकून तेथे रगेल आणि रंगेल पणाचा बुरखा पोलिसांनी फाडला आहे. तर, अगदी बस स्थानकाच्या समोर इतक्या गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या पुजा हॉटेलमध्ये कुकूचिकू करण्यासाठी जे काही कप्पे तयार केले होते. ते उध्वस्त करण्याचे आदेश भोये यांनी दिली आहे. तसेच कॉलेजच्या मुला-मुलींना नको ते चाळे करण्यासाठी कॉलेजरोड परिसरात जो कॅन्डल कॅफे तयार केला होता. त्यावर देखील धडक छापा टाकला आहे. यात ऋषीकेश अरुण डावरे (रा. निब्रळ. ता. अकोले) कॅन्डल कॅफे, पायल हॉटेलचे व्यवस्थापक प्रथमेश सुखदेव लबडे व पुजा हॉटेलचे व्यवस्थापक रामदास किसन लोहकरे यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम ३३ (एक्स) (ए) यानुसार कारवाई केली आहे.

Web Title: Obscene chala in hotel and cafe in Akole city, raid on hotel

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here