Home अहमदनगर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट, पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट, पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Ahmednagar Crime News: रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने आरोपीला अटक, आंदोलन आणि शेवगाव बंदची हाक.

Post about Chhatrapati Shivaji Maharaj creating communal tension Crime filed

शेवगाव | Shevgaon News: शेवगाव शहरात काल रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मिडीयात व्हायरल झाल्याने संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर एकत्र येऊन आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी (१३ मार्च) शेवगावमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री दोन युवकांनी सोशल नेटवर्किंग साइटवर छत्रपती शिवाजी महाराज यांची औरंगजेबासोबत तुलना करणारा मजकूर टाकल्यामुळे शेवगाव शहरात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. संतप्त झालेल्या शिवभक्तांनी शेवगाव पोलीस ठाण्याच्या प्रांगणात मोठी गर्दी केली. आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला. आरोपींना अटक करा, तरच आम्ही येथून उठू, अशी भूमिका त्यांनी घेतली. नागरिकांचा संताप पाहता शेजारील तालुक्यातील पोलीस पथक येथे दाखल झाले. शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यातील एक युवक अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

श्रीरामपुरचे उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, नगरचे उप विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सोनाईचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पथकासह शेवगावमध्ये दाखल झाले. या प्रकरणी साईनाथ कचरदास आधाट (रा. माळीवाडा, शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेच्या निषेधार्थ उद्या सोमवारी शेवगावमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील सर्व शिव प्रेमी संघटनांकडून शेवगाव बंदची हाक देण्यात आल्याचे अविनाश देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Post about Chhatrapati Shivaji Maharaj creating communal tension Crime filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here