Home क्राईम अवैध सावकारीचा बळी, 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या, आईचा हंबरडा

अवैध सावकारीचा बळी, 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या, आईचा हंबरडा

Nashik Crime News: उसनवारीचे पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने 24 वर्षीय युवकाने गळफास (Suicide) घेत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना.

Victim of illegal moneylender, 24-year-old commits suicide 

नाशिक: अवैध सावकारीचा फास आता हल्लीच्या तरुणांमध्ये आवळला जात असल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे मानसिक तणावातून अनेकजण टोकाचं पाऊल उचलतात. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे.

काही महिन्यांपूर्वीच नाशिक शहरात अवैध सावकारीमुळे अनेकांचा बळी गेल्याचे समोर आले होते. अशातच नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. उसनवारीचे पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्याने 24 वर्षीय युवकाने गळफास घेत स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्षल संजय गायकवाड असे या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी देवळा पोलिसांनी संशयित दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय हरी गायकवाड यांनी संशयित प्रवीण सदाशिव आहेर व अमोल निकम यांच्याकडून 21  लाख रुपये उसने घेतले होते. त्याबदल्यात हर्षल गायकवाडने या दोघांना तीन चेक दिले होते. मात्र खात्यावर पैसे नसल्याने हे चेक बाउंस झाले. यामुळे या दोघांनी फिर्यादीचा मुलगा हर्षल संजय गायकवाड यास प्रत्यक्ष भेटून तसेच मोबाईलवर वारंवार धमकी देत पैशांचा तगादा लावला. या त्रासाला कंटाळून हर्षल याने शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा प्रवीण आहेर या संशयित आरोपीला अटक केली असून दुसऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी भेट दिली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे करीत आहेत.

संजय गायकवाड यांना हर्षल हा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत हुशार असलेल्या हर्षलच्या निधनाने देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Victim of illegal moneylender, 24-year-old commits suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here