संतापजनक घटना: म्हाताऱ्याचा मतिमंद मुलीवर बलात्कार
Rape Case: म्हताऱ्याने मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual abused) केल्याची संतापजनक घटना.
Bhandara Rape Case : भंडाऱ्यातील एका मतीमंद मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. लाखनीतील वयोवृद्ध आरोपीने मुलीवर अत्याचार केला असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पीडित मुलगी पाच महिन्यांची गरोदर राहिल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. नारद गणपत वंजारी असं आरोपीचं नाव असून त्याची भंडाऱ्यातील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळं भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भंडाऱ्यातील लाखनी शहरात राहत असलेल्या एका १७ वर्षीय मुलीची आरोपीसोबत काही दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. डिसेंबरमध्ये गावात निवडणूक लागल्याने वडील प्रचारासाठी घराबाहेर गेले होते. त्यावेळी आरोपी नारदने घरात घुसून मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच या प्रकरणाची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. परंतु गेल्या काही दिवसांपासून पीडितेचं पोट दुखत असल्यामुळं ती गर्भवती असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं. त्यानंतर मतिमंद मुलीने नारद वंजारी याने लैंगिक अत्याचार केल्याचं काकूंना सांगितलं. पीडितेच्या काकूंनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
आरोपी नारद वंजारी याच्यावर पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने नारद वंजारी याची भंडाऱ्यातील कारागृहात रवानगी केली आहे.
Web Title: old man rape a mentally retarded girl
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App