Home बीड पुतण्या तारेला चिकटला, वाचविताना चुलत्याचाही मृत्यू

पुतण्या तारेला चिकटला, वाचविताना चुलत्याचाही मृत्यू

Beed News: विजेच्या धक्क्याने चुलता पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना.

Electric Shock Nephew clings to the wire, cousin also dies while saving

गेवराई | बीड: विजेच्या धक्क्याने चुलता पुतण्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  तालुक्यातील मन्यारवाडी येथील एका घराचे बांधकाम सुरू होते. यावेळी घराच्या छतावरून गेलेल्या विद्युत तारेला मिस्त्री असलेल्या पुतण्याचा हात लागल्याने तो चिकटला.

त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या चुलत्याचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेत दोघांच्या मृतदेहांचा कोळसा झाला होता. समीर जुबेर शेख (२६) व फेरोज इस्माईल शेख (३८, दोघे रा. संजयनगर, गेवराई) अशी मयतांची नावे आहेत. दोघेही मन्यारवाडी येथील रामजी डिंगरे यांच्या घराचे काम करीत होते. घरावरून गेलेल्या विद्युत तारेला समीरचा हात लागला. त्याला वाचविण्यासाठी गेलेले चुलतेही चिकटले. दोघांचाही क्षणार्धात मृत्यू झाला.

Web Title: Electric Shock Nephew clings to the wire, cousin also dies while saving

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here