अहमदनगर ब्रेकिंग: वीज वाहिनीस चिकटून चिमुकलीचा मृत्यू
Ahmednagar News: घराच्या छतावरुन गेलेल्या मुख्य वीजवाहीनीच्या तारेला चिटकून 9 वर्षीय बालिकेचा मुत्यू झाल्याची घटना.
जामखेड: घराच्या छतावरुन गेलेल्या मुख्य वीजवाहीनीच्या तारेला चिटकून 9 वर्षीय बालिकेचा मुत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.26) सायंकाळी जामखेड येथे घडली. शहरात अशा घरांवरून गेलेल्या वीज वाहिन्यांचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. ओमी म्हसकर (9, रा.वरकुटे. ता. करमाळा. जिल्हा सोलापूर) असे या मृत्यूमुखी झालेल्या बालिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमी म्हसकर ही मुलगी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वरकुटे गावची रहीवासी आहे. ती कालच जामखेड येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्नानिमित्त आपल्या आईसोबत येथे आली होती. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही मुलगी घराच्या स्लॅपवर इतर मुलांसोबत खेळत होती.
या वेळी लक्ष नसल्याने अचानक तीला या घरासमोरून गेलेल्या मेनलाईन च्या तारेचा धक्का बसला तशी ती मुलगी छतावरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाली होती. उपचार सुरू असतानाच तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Toddler dies by clinging to power line electric shock
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App