Home राहुरी अहमदनगर: दीड किलो गांजा, गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे दोघांना अटक

अहमदनगर: दीड किलो गांजा, गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे दोघांना अटक

Breaking News | Ahmednagar: मुळा नदी पात्रानजीक अग्निशास्त्रासह गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना राहुरी पोलिसांनी अटक , आरोपींकडून दीड किलो गांजा, गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख ४ हजार रुपय किमतीचा मुद्देमाल जप्त.

One and a half kg ganja, village pistol, live cartridges arrested two

राहुरी : शहरातील नगर-मनमाड मार्गावर मुळा नदी पात्रानजीक अग्निशास्त्रासह गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून दीड किलो गांजा, गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख ४ हजार रुपय किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पथकाने केली आहे.

राहुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना अज्ञात व्यक्ती देशी पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने काळ्या रंगाचे मोपेड वाहन (क्र. एम. एच- १६ डीएच ५६१३) वरून जॉन कॅसिनो परेरा (वय ३६) व अब्दुल वाहद सय्यद शाबिर (वय ३१ दोघे रा. अहमदनगर) हे देशी बनावटीचे पिस्टल ३ जिवंत काडतुसे, तसेच वाहनाच्या डिक्कीत लपविलेला दीड किलो गांजा असा एकूण १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींवर कोतवाली, चोपडा ग्रामीण आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Web Title: One and a half kg ganja, village pistol, live cartridges arrested two

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here