Home क्राईम मैत्रिणीशी प्रेमसंबंधाचा संशय, युवकाचा कोयत्याने खून

मैत्रिणीशी प्रेमसंबंधाचा संशय, युवकाचा कोयत्याने खून

Breaking News | Crime: मैत्रिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ऊसतोडणीच्या कोयत्याने वार करून निघृण खून.

Suspected of having an affair with a girlfriend, the youth was killed with a knife

सांगली:  वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा कारखाना परिसरात टायर पंक्चरच्या गाडीवर काम करणाऱ्या नामदेव प्रल्हाद शिंगे (वय ३०, रा. नरसिंहपूर, ता. वाळवा) याचे मैत्रिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ऊसतोडणीच्या कोयत्याने वार करून निघृण खून करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी संशयित अक्षय विष्णू शिंदे (रा. जुळेवाडी, ता. कराड, जि. सातारा) याला चिंचणी-वांगी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी अक्षय शिंदे हा त्याच्या मैत्रिणीसह सोनहिरा कारखान्याजवळ असणाऱ्या आदम रज्जाक तांबोळी (रा. अंबक) यांच्या मालकीच्या खोलीमध्ये राहत होता. तर मृत नामदेव शिंगे हा कारखाना परिसरात पंक्चर काढणाऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता.

नामदेव शिंगे याचे आपल्या मैत्रिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा अक्षय शिंदे याला संशय होता. त्यामुळे त्याचा नामदेववर राग होता. त्यातून त्याने गुरुवारी रात्री ११:३० वाजता नामदेव याच्या तोंडावर, गळ्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. जखमी नामदेव याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मृत झाला होता.

Web Title: Suspected of having an affair with a girlfriend, the youth was killed with a knife

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here