Home पाथर्डी अहमदनगर: पाणी भरत असताना टँकरखाली सापडून एकाचा मृत्यू

अहमदनगर: पाणी भरत असताना टँकरखाली सापडून एकाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar:  एकजण शासकीय टँकरचे पाणी भरत असताना चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू.

One died after being found under the tanker while filling with water

पाथर्डी: तालुक्यातील देवी धामणगाव येथे बुधवारी (दि. १) एकजण शासकीय टँकरचे पाणी भरत असताना चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. राजेंद्र रघुनाथ काळे (वय ५५) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईची झळ पाथर्डी तालुक्याला बसली आहे. त्यामुळे न सर्वाधिक टैंकरही तालुक्यात सुरू आहेत. टँकरद्वारे दुष्काळी भागाला पाणी दिले जात आहे.

बुधवारी दुपारच्या वेळी धामणगावात पाणी देण्यासाठी टँकर आले होते. हे टँकर पाणी वितरित करण्यासाठी ठिकठिकाणी जात असताना गावातील मरकड वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साठवणाऱ्या टाक्यांमध्ये पाणी सोडण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी टँकरच्या मागील चाकाखाली येऊन राजेंद्र काळे या गावातील व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त टैंकर ताब्यात घेतला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तसेच तहसीलदार उद्धव नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: One died after being found under the tanker while filling with water

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here