Home Accident News Accident | अहमदनगर: रेल्वे अपघातात एकाचा जागीच मृत्यू

Accident | अहमदनगर: रेल्वे अपघातात एकाचा जागीच मृत्यू

One died on the spot in a train accident

Ahmednagar | Shrirampur | श्रीरामपूर:  रेल्वे लाईन ओलांडत असताना रेल्वेची जोरात धडक बसल्याने या अपघातात (Accident) एकाचा जागीच मृत्यू (Died) झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे रेल्वे चौकी क्रमांक ४७ रेल्वे लाईन ओलांडताना घडली.  या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नरेंद्र गणपत गायधने (57, रा. निपाणीवडगाव, ता. श्रीरामपूर) असे या अपघातात मयत  झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात काल सकाळी 10 वाजून 45 वाजण्याच्या सुमारास घडला.

या अपघातात गायधने यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे तसेच नातेवाईकांना याची माहिती दिली. किरण किसन गायधने यांनी पोलीस ठाणे येथे कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सानप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत बारशे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह (Dead body) श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविला. शवविच्छेदनानंतर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: One died on the spot in a train accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here