Home अहमदनगर जामखेडमध्ये दरोडा रक्कम लंपास व मारहाणीत एक जखमी 

जामखेडमध्ये दरोडा रक्कम लंपास व मारहाणीत एक जखमी 

जामखेडमध्ये दरोडा रक्कम लंपास व मारहाणीत एक जखमी 

जामखेड :  तालुक्यातील पिंपरखेड येथील ओमासे वस्तीतील लबडे यांच्या घरी दरोडा टाकुन, दोन तोळे सोने व पाच हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. तर लबडे यांना चाकुने वार करीत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

याबाबत जामखेड पोलिस स्टेशन कडुन माहिती मिळलेल्या माहितीनुसार फिर्यादी अजिनाथ पांडुरंग लबडे (वय ३४ ओमासे वस्ती रा. पिंपरखेड) त्यांचा राहत्या घराजळील विरचना नदी शेजारील त्यांच्या शेताजवळुन दिगंबर दौलत आढाव, भगवान पोपळे, बापु दत्तु आढाव (सर्व रा. फक्राबाद.) हे सर्वजन दोन दिवसापासुन वाळुची उपसा करतात. मात्र त्या सतत च्या वाळु उपशामुळे तिथे पाणी थांबत नसल्यामुळे त्यांना वारंवार तुम्ही वाळु उपसा करु नका असे सांगुनही त्यांना याबाबत कोणतीच दखल घेतली नाही. या कारणावरुन वाळु उपसे व लबडे करणाऱ्यांत शाब्दीक बाचाबाची झाली.     मात्र (दि. २५) या बाचाबाचीचे रुपांतर रा. साडेबारा वाजण्याच्या सुमारास वरील दिगंबर दौलत आढाव हे तिघेजन व सोबतचे वाळु भरणारे अनोळखी पाच मजुर अजिनाथ लबडे यांच्य घरात जावुन च०ाकेुने व लाथाबुक्यांनी घरात जावुन  मारहाण  करुन   जबर जखमी केले.  वसेच त्यांच्या घरातील सामानाची उचकापाचक करुन एक तोळयाचे गंठण , आर्धा तोळयाचे कानातील फुले  व आर्धा तोळयाचे गळयातील बदाम, असे एकुण देान तोळे सोन्याचे दागिने व पाच हजार रोख रक्कम घेवुन आरोपी फरार झाले. यामध्ये  अजिनाथ पांडुरंग लबडे यांच्या मांडीवर व हातावर चाकुने वार करुन तसेच तोंडावर मारहाण करुन जबर जखमी केले आहे. या प्रकरणी जामखेड  पोलिस स्टेशनाला गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व पोलिस ना. दिनानाथ पातकळ पो. कॉ. गहिनीनाथ यादव यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे. कॉ. गहिनीनाथ यादव करित आहेत. अशी माहिती ठाणे अंमलदार महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल शबनम शेख यांनी दिली.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here