Home पुणे Accident: बस व इको कारचा भीषण अपघात, एक ठार, चार जखमी

Accident: बस व इको कारचा भीषण अपघात, एक ठार, चार जखमी

Junnar Accident: बस व इको कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू

One killed, four injured in road mishap Accident 

जुन्नर: नगर कल्याण महामार्गावर राजुरी ता. जुन्नर शिवारात बस व इको कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  

गुलशन शकील चौगुले (वय 48 रा. राजुरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  नगर कल्याण महामार्गावर राजुरी शिवारात आळेफाट्याच्या दिशेने जाणारी बस व राजुरीकडे जाणार्‍या इको कारला समोरासमोर धडक बसली. अपघात इतका भयानक होता की इकोकारचा चक्काचूर झाला. यामध्ये इको कारमधील गुलशन चौगुले यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मुलगा व चालक यासह दोन मुली असे चौघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी आळेफाटा येथे हलविण्यात आले आहे.

बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्याकडेला नालीत गेली. बसमध्ये तीस ते चाळीस प्रवासी होते, पण बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती समजताच आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: One killed, four injured in road mishap Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here