अहमदनगर ब्रेकिंग: पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने युवकाचा गळा आवळून खून
Ahmednagar murder Case: पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या कारणावरून त्याचा दोरीने गळा आवळून खून केला असल्याची प्राथमिक माहिती.
अहमदनगर: पत्नीबद्धल अपशब्द वापरल्याने झालेल्या वादातून दोघांनी युवकांनी एका युवकाचा गळा आवळून खून केल्याची घटना चास ता. नगर शिवारात ही घटना घडली आहे.
राहुल कनका मोरे (वय 19 रा. बाबुर्डी घुमट ता. नगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी हनुमंत नरसू गायकवाड (वय- 24) व सुरज लक्षमन मोरे (वय 22 दोघे रा. बाबुर्डी घुमट) यांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
राहुलने सूरजच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याच्या कारणावरून त्याचा दोरीने गळा आवळून खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 120 (ब), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
Web Title: Young man strangled to death for insulting his wifeYoung man murder for insulting his wife