Home क्राईम अकोले शहरात एकास बेदम मारहाण; व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

अकोले शहरात एकास बेदम मारहाण; व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Akole Crime: दुकानासमोर लावलेला बेकायदेशीर लोखंडी जिना काढत असताना दुकान मालकास अंगावरील कपडे फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी.

One was brutally beaten in Akole town A crime was filed against the traders

अकोले : अकोले शहरात दुकानासमोर लावलेला बेकायदेशीर लोखंडी जिना काढत असताना दुकान मालकास अंगावरील कपडे फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी शहरातील व्यापारी अमित रासने, राजेंद्र शरद रासने, मयूर सुनील रासने, विशाल अशोक रासने, अमोल येवले, श्याम अशोक शेटे यांच्यावर अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ऋषिकेश सतीश धोपटे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आमचे शहरातील रासने कॉम्पलेक्स येथील गाळ्यात कोल्ड्रिंक्सचे दुकान आहे. या दुकानाचा बोर्ड काढून अमित भारत रासने याने लोखंडी जिना बेकायदेशीर लावला होता. या जिन्यामुळे आमच्या दुकानाला अडथळा होत असून दुकानात येण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मी व माझ्या समवेत कामगार राजू गुलाब शेख, समिर राजू शेख, भाऊ अनिकेत सतिश धोपटे जिना काढत असताना तेथे अमित भारत रासने, राजेंद्र शरद रासने, मयुर सुनिल रासने, विशाल अशोक रासने यानी येऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यानंतर सायंकाळी ६:३० वा सुमारास हे सर्व रासने व त्यासोबत अमोल येवले, श्याम शेटे हातात काठ्या घेऊन येऊन मला व माझ्यासोबत असलेले माझ्या सहकाऱ्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास अकोले पोलीस करीत आहे.

Web Title: One was brutally beaten in Akole town A crime was filed against the traders

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here