Home कोल्हापूर घरालाच बनवला वेश्या अड्डा, वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पतीला अटक; पीडित पत्नीची सुटका

घरालाच बनवला वेश्या अड्डा, वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या पतीला अटक; पीडित पत्नीची सुटका

Prostitution Business: पतीकडूनच पत्नीच्या असहयातेचा फायदा घेत वेश्या व्यवसाय चालविल्याची घटना.

Prostitution den made at home, husband who runs prostitution business arrested

कोल्हापूर: कोल्हापूर मधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीकडूनच पत्नीच्या असहयातेचा फायदा घेत वेश्या व्यवसाय चालविल्याची घटना समोर आली आहे. पतीला अटक.

पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच वेश्या अड्डा सुरु केल्याची घटना कोल्हापुरात घडली. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बालिंगा (ता. करवीर) येथे छापेमारी करत वेश्या अड्ड्यावर कारवाई करत पीडित महिलेची सुटका केली. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार बालिंगा परिसरात एका घरातच वेश्या अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छापा टाकला असता पतीकडूनच पत्नीच्या असहाय्यतेचा गैरफायदा उठवत वेशा अड्डा चालवल्याचे समोर आले. पीडित महिला आणि तिचा पती दोघे मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच कोल्हापुरात वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून दोघा तरुणांना अटक केली होती. एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली होती. करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे हा प्रकार घडला.

भारती विद्यापीठ रोडवर कंदलगाव हद्दीत एका रेस्टॉरंटमध्ये काही काळापासून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. गरीब, गरजू महिलांना लॉजिंगवर बोलावून तेथे त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते.

Web Title: Prostitution den made at home, husband who runs prostitution business arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here