Home अहमदनगर संगमनेर ब्रेकिंग! डोक्यात दगड घालून एकाचा खून

संगमनेर ब्रेकिंग! डोक्यात दगड घालून एकाचा खून

Breaking News | Sangamner: ६५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना.

One was killed by a stone on the head

संगमनेर: तालुक्यातील साकूर जवळील चिंचेवाडी येथून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे.  चिंचेवाडी शिवारातील मलीबाबा मंदिरासमोर ६५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री च्या सुमारास घडली असून गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे पठारभागात एकच खळबळ उडाली आहे.

देवराम मुक्ता खेमनर वय ६५ रा. चिंचेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर असे खून झालेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. हा नेमका खून कुणी केला? कोणत्या कारणासाठी केला याबाबत कारण अस्पष्ट आहे. घारगाव पोलीस याबाबत कसून चौकशी करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, , साकूर – संगमनेर महामार्गालगत चिंचेवाडी शिवारात मलीबाबा मंदिर आहे. मंदिराबाहेर छोटस शेड उभारले आहे. याच शेडमध्ये देवराम खेमनर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. गुरूवारी सकाळी काही नागरिकांनी मंदिराजवळ बघितले असता देवराम खेमनर अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली अन एकच गर्दी झाली होती.

या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्यासह पोलीस काॅन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडके, गणेश लोंढे, नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ दगड, चप्पल, आधारकार्ड आढळून आले. यावेळी दगड पुर्णपणे रक्ताने माखलेले होता. घटनेची गांभीर्य घेत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली‌. तसेच पंचनामा केला. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Web Title: One was killed by a stone on the head

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here