Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनरने अ‍ॅपेला चिरडले; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार

अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनरने अ‍ॅपेला चिरडले; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार

Container crushed the apple; 6 killed in road Accident

Ahmednagar Breaking | Kopargaon | कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात झगडे फाटा कोपरगाव महामार्गावर पगारे वस्ती नजीक कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) घडला.  

हा अपघात इतका भीषण होता की अ‍ॅपे रिक्षा पूर्ण चक्काचुर झाली आहे. या अपघातात दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी, दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. ॲपे रिक्षा मधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

राजाबाई साहेबराव खरात वय ६० रा. चांदेकसारे, आत्माराम जम्मानसा नाकोडे वय ६५ रा. वावी, पूजा नानासाहेब गायकवाड वय २० रा. हिंगणवेढे, प्रगती मधुकर होन वय २० रा. चांदेकसारे, शैला शिवाजी खरात वय ४२ रा. श्रीरामपूर, शिवाजी मारुती खरात वय ५२ रा. श्रीरामपूर अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.

विलास साहेबराव खरात वय ३४ रा. चांदेकसारे, कावेरी विलास खरात वय ५ रा. चांदेकसारे, रुपाली सागर राठोड वय ४० रा. सिन्नर, द्र्व सागर राठोड वय १७ रा. सिन्नर हे जखमी झाले आहेत. तर मोटारसायकलवरील दिगंबर चौधरी, सर्वेश दिगंबर चौधरी वय १२, बहिण कृष्णाबाई गोविंद चौधरी वय ४२ सर्व रा. पोहेगाव हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर एस.जे.एस. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की झगडेफाट्यावरून ॲपे रिक्षा पॅसेंजर घेऊन कोपरगावकडे जात असताना पगारे वस्ती जवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन या कंटेनरने दोन मोटरसायकल स्वारांना देखील चिरडले आहे ते देखील गंभीर जखमी झाल्याचे समजते..

Web Title: Container crushed the apple; 6 killed in road Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here