Home अहमदनगर घर मालकाकडून दोघा बहिणींना मारहाण व विनयभंग

घर मालकाकडून दोघा बहिणींना मारहाण व विनयभंग

Ahmednagar Two sisters beaten and molested by landlord

Ahmednagar | अहमदनगर: भाड्याने राहत असलेले घर खाली करण्यासाठी घर मालकाने दोघा बहिणींना मारहाण (Beaten) करत विनयभंग (molested) केल्याची घटना बुधवारी सकाळी अहमदनगर शहरात घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिलेल्या फिर्यादीवरून फिर्यादीवरून नरेश भूमकर,  तीन महिला यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला गेल्या अनेक दिवसांपासून नरेश भूमकर यांच्या घरात भाड्याने राहतात. बुधवारी सकाळी फिर्यादी व त्यांची बहिण घरी असताना तेथे नरेश भूमकर, व महिला यांनी बळजबरीने घरात प्रवेश केला. लवकर घर खाली करा, मी आज तुमचे सामान बाहेर फेकणार आहे, असे म्हणत नरेश फिर्यादीवर धावून आल्या. त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यांच्या बहिणीला देखील मारहाण केली. नरेशने फिर्यादी महिलेचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Ahmednagar Two sisters beaten and molested by landlord

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here