Home महाराष्ट्र Weather News: राज्यात यंदाच्या पावसाबाबत हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज

Weather News: राज्यात यंदाच्या पावसाबाबत हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज

Weather News 200 panjab Dakh

Weather News: राज्यात यावर्षीही समाधानकारक पाऊस पडुन शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिला आहे.

दरवर्षी 3 मार्चला दिला जाणारा पंजाब डख यांचा हवामान अंदाज आत्तापर्यंत खरा ठरत आला असुन यावर्षी म्हणजे 2022 ला थोडा उशीरा अंदाज देत मुबलक पाऊस पडणार असल्याचे त्यांनी वर्तविले आहे.

राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस सुरु होणार असुन त्यानंतर राज्यात पुर्ण पावसाळा समाधानकारक पाऊस पडणार आहे.

जुन महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडुन लागलीच अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण होतील तर उर्वरित शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी जुलैमध्ये पुर्ण होतील असे त्यांनी सांगितले आहे.

तर  जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात वर्षातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तरी शेतकरी बांधवांनी योग्य तयारी करून नियोजन करावे. तसेच पाऊस चालू होण्याच्या पूर्वीच शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची मुबलक उपलब्धता करून ठेवावी जेणेकरून योग्य वेळी पेरणीचे नियोजन करता येईल अशा सूचनादेखील त्यांनी केलेल्या आहेत.

Web Title: Weather News 200 panjab Dakh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here