Home अहमदनगर Drowned:  धरणामध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

Drowned:  धरणामध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

Schoolboy drowned in dam

Ahmednagar | Parner | पारनेर: नगर  येथील १६ वर्षीय शाळकरी मुलाचा मांडओहोळ धरणामध्ये पोहत असताना बुडून (Drowned) मृत्यू (Death)झाल्याची घटना घडली आहे.

कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथे गुरुवार, दि. ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमाराम नगरहून कुटुंबातील २० जण फिरण्यासाठी आले होते. धरणातील पाण्यात पोहण्यासाठी अनेक जण उतरले होते. मात्र, यातील तरुण मोहसीन मुकीनमुद्दीन काझी (वय १६) याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.

नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यावर स्थानिक लोकांनी बचावाचा प्रयत्न केला. मोहसीनला पाण्याबाहेर काढून टाकळी ढोकेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉ. संदीप देठे यांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेत मोहसीनचे दोन साथीदार बालंबाल बचावले. याबाबत म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे व पोलिस कॉन्स्टेबल गवळी यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मोहसीनला पाण्याबाहेर काढले. टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Schoolboy drowned in dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here