Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित दुहेरी हत्याकांडाचा निकाल, गोळ्या घालून केली हत्या

अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित दुहेरी हत्याकांडाचा निकाल, गोळ्या घालून केली हत्या

Ahmednagar Jamkhed Murder Case:  राजकीय वर्चस्व वादातून दुहेरी हत्याकांड, साडेचार वर्षापूर्वी गोळ्या घालून हत्या.

Jamkhed outcome of the much-publicized double murder case

जामखेड: जामखेड येथील योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची राजकीय वाद तसेच पोस्टर फाडल्याच्या रागातून साडेचार वर्षापूर्वी गोळ्या घालून हत्या झाली होती. याबाबत आज दि. २८ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम निकाल देत यातील एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा तर १३ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मयत योगेश राळेभात व राकेश राळेभात हे साडेचार वर्षापूर्वी दि. २८ एप्रिल २०१८रोजी सायंकाळी बीड रोड छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर एका हाॅटेल मध्ये चहा पीत असताना आरोपींनी गोळ्या घालून हत्या केली होती.

राजकीय वर्चस्व वादातून दुहेरी हत्याकांड झाल्यामुळे या खटल्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन या खटल्यात राज्य शासनाने विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती केली होती. श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांच्या समोर खटल्याची सुनावणी पुर्ण झाली आज २८ रोजी अंतिम निकाल देण्यात आला यानुसार आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर यातील विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काकासाहेब बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव, धनाजी धनराज जाधव या तेरा आरोपांची निर्दोष मुक्तता झाली.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

खटल्यात सरकारी पक्षाने प्रत्यक्षदर्शीसह पोलीस अधिकारी आदी एकूण ३२ साक्षीदारांची तपासणी केली. बचाव पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. राजकीय वर्चस्व वादातून हे दुहेरी हत्याकांड झाल्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अंतिम लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला. सदर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, आज बुधवार रोजी अंतिम निकाल देण्यात आला.

Web Title: Jamkhed outcome of the much-publicized double murder case

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here