Home अहमदनगर अहमदनगर:  दोघा भावांवर कोयत्याने वार, एकाची प्रकृती चिंताजनक

अहमदनगर:  दोघा भावांवर कोयत्याने वार, एकाची प्रकृती चिंताजनक

Ahmednagar , Rahuri Crime:  क्रिकेट खेळू दिले नाही म्हणून एका तरुणाने दोघा भावांवर कोयत्याने वार वांबोरीची घटना : आरोपीला अटक, एकाची प्रकृती चिंताजनक.

Ahmednagar Crime Two brothers were stabbed

राहुरी: क्रिकेट खेळू दिले नाही म्हणून एका तरुणाने दोघा भावांवर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी (दि. २६) वांबोरी येथे घडली. घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताबडतोब गजाआड केले.

ऋषिकेश अरुण कल्हापुरे (वय १९, रा. वांबोरी) हा तरुण सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्याचा भाऊ नकुल, मामेभाऊ समर्थ तसेच त्याच्या घराजवळ राहणारे इतर काही तरुण नेहरू मैदान येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तेथे गोकुळ श्याम कोरडे हा आला व ऋषिकेशचा भाऊ नकुल याच्या हातातील बॅट घेऊन मला दोन तीन बॉल टाका, असा म्हणाला. त्यावेळी नकुल त्याला म्हणाला, ‘आता आमची मॅच सुरू होणार आहे. माझी बॅट दे, असे म्हणाला. याचा त्याला राग आला. त्याने नकुल यास शिवीगाळ दमदाटी करून बॅटने मारहाण करून निघून गेला.

त्यानंतर ३ वाजेच्या सुमारास गोकुळ श्याम कोरडे हा ऋषिकेश कल्हापुरे याच्या घरासमोर धारदार कोयता घेऊन गेला व त्याचा भाऊ नकुल यास शिवीगाळ करू लागला. तसेच ऋषिकेश कल्हापुरे व नकुल कल्हापुरे या दोघा भावांवर कोयत्याने वार केले. त्यावेळी काही जणांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्याची गाडी व कोयता घटनास्थळी टाकून पसार झाला. पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन एक दुचाकी व कोयता असा मुद्देमाल जप्त केला आहेत.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

जखमी झालेल्या ऋषिकेश कल्हापुरे व नकुल कल्हापुरे या दोघा भावांवर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रक्तस्राव जास्त झाल्याने एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. राहुरी पोलिस पथकाने आरोपीला सोमवारी मध्यरात्री अटक केली. ऋषिकेश अरुण कल्हापुरे याने दिलेल्या जबाबावरून आरोपी रोहित ऊर्फ गोकुळ श्याम कोरडे (वय १९, रा. वांबोरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार दिनकर चव्हाण करीतआहे.

Web Title: Ahmednagar Crime Two brothers were stabbed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here