Home अहमदनगर संतापजनक! शिक्षकानंच केला अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग; अहमदनगर घटना

संतापजनक! शिक्षकानंच केला अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग; अहमदनगर घटना

Ahmednagar Crime: जिल्हा परिषद शाळेतील एका मद्यपी शिक्षकाने सहावी सातवी वर्गात शिकविणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या अंगाला नको तिथे हात लावत विनयभंग (Molested) केल्याची घटना.

teacher molested the minor students

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका मद्यपी शिक्षकाने सहावी व सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या अंगाला नको तिथे स्पर्श करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेऊन गजाआड केले.

राहुरी तालुक्यातील निंभेरे परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोपी मदन दिवे या विकृत व मद्यपी शिक्षकाने सहावी व सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींच्या अंगाला नको तिथे स्पर्श करून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या घटनेबाबत सदर मुलींनी त्यांच्या घरातील लोकांना शिक्षक करत असलेल्या विकृत चाळ्यांची माहिती दिली. मुलींच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी ताबडतोब त्या शिक्षकाला ताब्यात घेऊन गजाआड केले.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून आरोपी मदन रंगनाथ दिवे, रा. दाढ बुद्रुक, ता. राहता. यांच्या विरोधात कलम ३५४ (अ) पोस्को ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निरज बोकील हे करीत आहे.

Web Title: teacher molested the minor students

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here