Home क्राईम संगमनेरातील प्रकार: एटीएम कार्डची अदलाबदल करून खात्यातील पैसे लंपास

संगमनेरातील प्रकार: एटीएम कार्डची अदलाबदल करून खात्यातील पैसे लंपास

Sangamner Crime:  एटीएम कार्डची अदलाबदल करीत भामट्याने काढले बावीस हजार युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधील प्रकार.

Sangamner Crime Money in the account by exchanging the ATM card

संगमनेर : एटीएम कार्डची अदलाबदल करीत भामट्याने एटीएम मशीनमधून २२ हजार ६०० रुपये काढून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.  हा प्रकार शुक्रवारी (दि.२३) दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास युनियन बँक ऑफ इंडियाच्या संगमनेर शाखेतील एटीएम केंद्रात घडला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सतीश प्रकाश चौधरी (मूळ रा. लहित, ता. अकोले, हल्ली रा. पंपिंग स्टेशन, कासारा दुमाला रस्ता, मालपाणी हेल्थ क्लबजवळ, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवस बँकेला सुटी होती. त्यानंतर बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर सोमवारी (दि.२६) चौधरी यांनी फिर्याद दिली. युनियन बँक ऑफ इंडियाच्या संगमनेर शाखेतील एटीएम केंद्रात चौधरी हे पैसे काढण्यासाठी गेले होते.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

त्यावेळी एटीएम केंद्रात असलेल्या व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित केले. एटीएम कार्डची अदलाबदल केली. चौधरी यांचे एटीएम वापरून त्यांच्या बँक खात्यावरील २२ हजार ६०० रुपये काढून घेतले. शहर पोलिस ठाण्यातील प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Sangamner Crime Money in the account by exchanging the ATM card

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here