Aurangabad Crime: तीन जणांनी एका विवाहित महिलेवर शेतात नेऊन दोनदा बलात्कार (Rape) केला
औरंगाबाद: गंगापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून तीन जणांनी एका विवाहित महिलेवर शेतात नेऊन दोनदा बलात्कार (Rape) केला आहे. याबाबत पिडीत ३२ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसांनी तिघांविरोधात बलात्कार व अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडिता मागील महिन्यात १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेली होती. यावेळी भगवान अशोक सुकाशे याने अत्याचार करून मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर १ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता शौचास जात असताना भगवान सूकाशे, रामेश्वर अशोक सुकाशे, अमरनाथ सुनील सुकाशे या तिघांनी दुचाकीवरून पाठलाग केला. बाजूच्या कापसाच्या शेतात बळजबरी नेऊन भगवान सुकाशे याने इतर दोघांच्या मदतीने पुन्हा पिडीतेवर अत्याचार केला. तसेच वाच्यता केल्यास पतीला आणि तुला जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पीडितेने आज (दि.८) सकाळी गंगापूर पोलिसात ठाण्यात दिली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी भगवान अशोक सुकाशे (३२) रामेश्वर अशोक सुकाशे (२९) आणि अमरनाथ सुनील सुकाशे (१९. सर्व रा. संजरपुर ता. गंगापूर जि. औरंगाबाद) यांच्या विरोधात बलात्कार, जीवे मारण्याची धमकी, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा (Crime) दाखल केला आहे. तसेच तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेल्हे हे करीत आहेत.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
अत्याचाराची वाच्यता केल्यास तुला व तुझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी आरोपीने पीडितेला दोन्ही वेळा दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने झालेल्या अत्याचाराबद्दल कोणालाही सांगितले नाही. मात्र, आरोपीने अत्याचाराचा व्हिडिओ बनवला होता. काही दिवसांनी आरोपींनी व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला. हे पीडितेच्या पतीला समजले. त्यानंतर महिलेने माहेरी याबद्दल सांगितले. माहेरच्या मंडळींनी धीर दिल्यानंतर पीडितेने भावाच्या मदतीने पोलिसात तक्रार दिली.
आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: Outrageous The tri rape the woman by taking her to the farm
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App