Home अकोले अकोले: निवडणूक कामासाठी जाताना अपघातात शिक्षकाचा मृत्यू

अकोले: निवडणूक कामासाठी जाताना अपघातात शिक्षकाचा मृत्यू

Accident: पानशेतजवळ ट्रकने दुचाकीला दिली धडक.

Teacher dies in an accident while going for election work

भोर: ग्रामपंचायत निवडणुकीचे कर्तव्य बजावण्यासाठी जाताना ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. हा अपघात वेल्हे तालुक्यातील धानेप गावाच्या हद्दीत झाला.

सागर नामदेव देशमुख (वय ३३, सध्या रा. पोळ, कंधारवाडी, ता. वेल्हे, मूळ रा. राजूर, ता. अकोल , Rajur Akole) असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी ट्रकचालक प्रकाश दिलीप शिंदे (रा. उत्रोली, ता. भोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांची ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. निवडणूक साहित्य घेण्यासाठी ते पानशेतवरून दुचाकीवरून सागर देशमुख वेल्हे येथे जात होते. दरम्यान, येथील पुलावर दुचाकीला समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. देशमुख ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्वरित वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर हिरास यांनी सांगितले. अतिशय प्रामाणिक, कार्यतत्पर शिक्षक असा त्यांचा परिचय होता. त्यांच्या मृत्यूमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी नुकताच शिक्षक सेवक कालावधी पूर्ण केला होता. सेवा नियमित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवल्याचे गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी सांगितले.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: Teacher dies in an accident while going for election work

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here