Home Accident News Ahmednagar Accident:  चार चाकीची दुचाकीला जोरदार धडक एक जण ठार

Ahmednagar Accident:  चार चाकीची दुचाकीला जोरदार धडक एक जण ठार

Parner Accident A four-wheeler hit a two-wheeler, killing one person

Ahmednagar Parner News | पारनेर:  पारनेर तालूक्यातील सुपा येथे नगर पुणे महामार्गावर चार चाकी कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत चुलता ठार तर पुतण्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात (Accident of Two wheeler) बुधवारी दुपारी घडला आहे. चार चाकी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत सुपा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  शहाजापुर (ता.पारनेर) येथील शशिकांत गवळी व त्यांचा पुतण्या गणेश गवळी हे आज बुधवारी दुपारी दुचाकीवरुन सुप्याच्या दिशेने येत असतांना पाठीमागून पुण्याकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीने जोराची धडक दिल्याने अपघात घडला.  धडक इतकी जोराची होती दुचाकीवरील चुलते पुतण्या बाजूला उडून पडले. यामध्ये शशिकांत गवळी जागीच ठार (Death) झाले तर गणेश गवळी गंभीर जखमी झाले. जखमीला सुपा येथे खाजगी रुग्णालयात व नंतर पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या अपघातातील चारचाकी गाडी व चालक बाबासाहेब छबु माने (रा. महात्मा फुले विद्यापिठ, राहुरी) यास सुपा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शशिकांत गवळी यांचा मृतदेह तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. सुनिल कुटे, ओहळ तपास करीत आहे.

Web Title: Parner Accident A four-wheeler hit a two-wheeler, killing one person

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here