Home अहमदनगर भरधाव कारचा टायर फुटल्याने समोरून येणार्‍या कारवर आदळुन अपघात

भरधाव कारचा टायर फुटल्याने समोरून येणार्‍या कारवर आदळुन अपघात

Parner Accident in an oncoming car due to a flat tire

Ahmednagar News Live | Parner Accident | पारनेर:  अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटा परिसरात भरधाव कारचा टायर फुटल्याने ती विरूद्ध दिशेने येणार्‍या कारवर आदळुन झालेल्या अपघातात सातजण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अहमदनगरहून पुण्याच्या दिशेने जात सलेल्या कारचा टायर फुटल्याने ती कार रोड दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला पुण्याहून अहमदनगरच्या दिशेने येत असलेल्या कारवर आदळली यात दोन्ही गाडीतील चालकांसाह सात जण जखमी झाले. या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत तर एक चालक व एक लहान मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील दोनही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिकेतून सुपा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच सुपा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य केले.

Web Title: Parner Accident in an oncoming car due to a flat tire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here