Home अहमदनगर अहमदनगर: कंटेनरच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू

अहमदनगर: कंटेनरच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यू

Ahmednagar | Parner News: अहमदनगर- पुणेमहामार्गावर कंटेनरने जोराची धडक (Accident) दिल्याने माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

Parner Ex-serviceman dies in collision with container Accident

पारनेर | जातेगाव : अहमदनगर- पुणेमहामार्गावर कंटेनरने जोराची धडक दिल्याने माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी (दि.२६) सायंकाळी घडला. शिवाजी ठाणगे असे मयत माजी सैनिकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेलेली माहिती अशी की, रविवारी सांयकाळी शिवाजी दत्तू ठाणगे (वय ४२), हे सुक्युटी (क्र. १६, बी. एक्स ९३४२) या गाडीने चालले होते. सुपा-नगर रोडवर हॉटेल संदीपजवळरस्ता ओलांडत असताना पुण्याहून नगरच्या दिशेने आलेल्या कंटेनर (क्र. एमएच १२ आरएन ६५७९)या गाडीने त्यांना जोराची धडक दिली. या वेळी ठाणगे हे कंटेनरच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाले.

या घटनेची माहिती कळताच पीएसआय पवार, सुपा पोलीस स्टेशनचे चालक शिंदे, ट्रॅफिकचे पोलीस हवालदार शिंदे, पोकॉ. सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त गाड्या बाजुला घेऊन ठाणगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

Web Title: Parner Ex-serviceman dies in collision with container Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here