Home अहमदनगर नवऱ्याला मारून टाकण्याची धमकी देत तरुण विवाहितेचा विनयभंग

नवऱ्याला मारून टाकण्याची धमकी देत तरुण विवाहितेचा विनयभंग

Parner married woman threatened to kill her husband

पारनेर | Parner: महिलेवर विनयभंग घटना पारनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. पारनेर तालुक्यातील विवाहित तरुणी घरात एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश करत तू मला आवडतेस असे म्हणत विनयभंग केला.

याप्रकरणी पिडीत विवाहित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष जालिंदर सुबे रा. गोरेगाव पाडळी ता. पारनेर असे या आरोपीचे नाव आहे.

सुबे याने विवाहित महिला तिच्या घरात एकटी असताना घरात येऊन तू मला आवडते असे म्हणत विनयभंग केला. तू जर तुझ्या नवऱ्याला सांगितले तर तुला व तुझ्या नवऱ्याला जिवंत ठेवणार नाही असे धमकी दिली.

याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष जालिंदर सुबे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम हे करीत आहे.   

Web Title:  Parner married woman threatened to kill her husband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here