Home अहमदनगर Ahmednagar: जिल्हा बँकेत चार जागेसाठी यांच्यात रंगणार लढत

Ahmednagar: जिल्हा बँकेत चार जागेसाठी यांच्यात रंगणार लढत

Fighting for four seats in the Ahmednagar district bank

अहमदनगर |  Ahmednagar: जिल्हा सहकारी बँकेच्या २१ पैकी १७ जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. नगर, कर्जत, पारनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटी मतदार संघ व बिगरशेती मतदारसाठी निवडणूक होत आहे.

जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक सहा सदस्य, भाजपाचे पाच सदस्य, कॉंग्रेस चार, सेना एक असे बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. तर माजी आमदार कर्डिले बिनविरोध निवडून आणण्यात अपयश आले आहे.

कर्जत तालुक्यात अंबादास पिसाळ, मीनाक्षी सुरेश साळुंके यांच्यात लढत होणार आहे. तर नगर तालुक्यात शिवाजीराव कर्डिले व सत्यभामाबाई भगवान बेरड यांच्यात लढत होणार आहे. तसेच पारनेर येथे राष्ट्रवादीचे उदय शेळके व रामदास भोसले यांच्यात सामना रंगणार आहे.

बिगर कृषी मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती प्रशांत गायकवाड व दत्तात्रय  पानसरे यांच्यात लढत रंगणार आहे.  या चार जागेंसाठी येत्या २० फेब्रुवारी रोजी निवडणूक होईल.

शिवसेना हा महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असून त्यांना जिल्हा बँकेत शंकरराव गडाख केवळ एक जागा निवडून आणता आली. शिवसेनच्या तुलनेत भाजपने सरशी केली आहे.

Web Title: Fighting for four seats in the Ahmednagar district bank

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here