संगमनेरात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद
संगमनेर | Sangamner: पुणे नाशिक महामार्गावर खांडगाव शिवारात असलेल्या बोगद्याजवळ अंधारात दरोड्याच्या उद्देशाने थांबलेल्या पाच चोरट्यांच्या टोळीला संगमनेर पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली.
यावेळी एका चोरटा अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या चोरट्यांकडून दरोड्याचे साहित्या व मोबाईल, मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख रात्री गस्त घालत असताना त्यांना गुप्त खबऱ्याद्वारे माहिती मिळाली की, महामार्गाच्या बोगद्याजवळ अंधारात टोळी उभी आहे. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून लुटण्याचा प्रयत्न करीत आहे अशी खात्रीदायक माहिती मिळाली.
यावरून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सदरची माहिती उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांना दिली. त्यानुसार या ठिकाणी रात्री दीड वाजेच्या सुमारास छापा टाकला असता अंधारात वरील पाच जणांची टोळी दिसली. पोलिसांची चाहूल लागताच चोरटे पळून गेले मात्र पोलिसांनी पाठलाग करीत चार चोरट्यांना पकडले.
जालिंदर मच्छिंद्र बर्डे वय ३० रा. गहा, ता. राहुरी, गणेश मच्छिंद्र गायकवाड वय ३०, सोमनाथ अर्जुन पवार वय २१ रा. बाजारवाकडी जि. अहमदनगर, लखन अर्जुन पिंपळे रा. दोडरिवर ता. सिन्नर यांना अटक करण्यात आली. तर अशोक हरिभाऊ बनवटे रा. श्रीरामपूर हा पळून गेला.
यावेळी त्यांच्याकडून विव्हो कंपनीचा मोबाईल तसेच दोन मोटारसायकली, दरोड्याचे साहित्य आढळून आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील पोलीस पथकाने केली.
Web Title: Gang arrested for robbery in Sangamner