Home अहमदनगर रिक्षाचालक निघोज कुंडात गेला वाहून, शोध कार्य सुरु

रिक्षाचालक निघोज कुंडात गेला वाहून, शोध कार्य सुरु

Parner rickshaw driver went to Nighoj Kunda

पारनेर | Parner: पारनेर तालुक्यातील निघोज कुंडामध्ये रिक्षाचालक पाय घसरून पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. अजूनपर्यंत त्याचा शोध लागला नाही. पोलीस प्रशासन शोध घेण्याचे काम करीत आहे.

अशा सुरेश जगदाळे वय ४५ रा, रांजणगाव ता. शिरूर व इतर तीन महिला असा इसाक रहमान तांबोळी वय ३५ यांच्या रिक्षामधून जवळा येथे आल्या होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फराळ देऊन परतत असताना या महिला निघोज कुंड पर्यटन क्षेत्र येथे दर्शनासाठी थांबल्या. त्याचवेळी रिक्षाचालक निघोज पाय धुण्यासाठी गेला असता शेवाळ असल्यामुळे पाय घसरून कुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. तो वाहून जात असताना तेथील काही लोकांनी पाहिले आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत तो कुंडात वाहून गेला होता.

याबाबत स्थानिकांनी पारनेर पोलीस स्टेशनला कळविले. माहिती समजताच पोलीस निरीक्षक राजेश गवळी व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यांनतर इसाक रहमान तांबोळी यांचा शोध घेण्याचे काम सुरु झाले.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Parner rickshaw driver went to Nighoj Kunda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here