Home अहमदनगर संगमनेर तालुक्याने ओलांडला चार हजार रुग्णांचा टप्पा

संगमनेर तालुक्याने ओलांडला चार हजार रुग्णांचा टप्पा

Sangamner Taluka corona patient Out of 4000

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बुधवारी 20 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रुग्णसंख्येने 4 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण बाधितांची संख्या 4 हजार 5  इतकी झाली आहे.

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात गुंजाळवाडी येथे सर्वाधिक सात रुग्ण आढळून आले आहेत. तर शहरात केवळ तीन रुग्ण आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे.

शहरात इंदिरानगर येथे 30 वर्षीय पुरुष, जिल्हा बँके समोरील भागातून 45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे.

तर तालुक्यात धांदरफळ बुद्रुक येथील 35 वर्षीय पुरुष, चिकणी येथे 72 वर्षीय पुरुष, सारोळे पठार येथे 78 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय मुलगा, बोटा येथे 49 वर्षीय पुरुष,गुंजाळवाडी येथून आज पुन्हा एकदा सात रुग्ण समोर आले असून त्यात 40 वर्षीय महिला, 40, 23 वर्षीय पुरुष,  2 वर्षीय बालिका, 3 महिन्याचे बालक, रहाणे मळा येथे 73 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, समनापुर येथे 49 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे 58 वर्षीय पुरुष, 48,23 वर्षीय महिला बाधित आढळून आल्या आहेत.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka corona patient Out of 4000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here