Home अहमदनगर निवृत्त प्राचार्यांचा बंगला फोडला लाखो रुपयांची चोरी

निवृत्त प्राचार्यांचा बंगला फोडला लाखो रुपयांची चोरी

Parner rupees stolen from bungalow of retired principal

पारनेर | Parner: पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथील सेवा निवृत्त प्राचार्यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी साडे अकरा तोळे सोने व बाराशे रुपये असे एकूण ३ लाख ४९ हजार रुपयांची ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य सखाराम कोंडाजी ठुबे यांचा कान्हूर पठार येथे बंगला आहे. रविवारी पहाटे ते कुटुंबासोबत झोपलेले असताना  अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या लोखंडी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला व घरातील सामानाची उचकापाचक केली. लाकडी कपाटातील साडे अकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व व खिशातील बाराशे रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला. यावेळी ठुबे यांच्या पत्नी आशालता ठुबे यांना जाग आली हे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. या चोरीची माहिती पारनेर पोलिसांना देण्यात आली आहे.

Web Title: Parner rupees stolen from bungalow of retired principal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here