Home क्राईम प्रेयसीसाठी व्हेलेंटाईन डे लाच केली पत्नीची हत्या

प्रेयसीसाठी व्हेलेंटाईन डे लाच केली पत्नीची हत्या

Valentine's Day bribe for girlfriend killed wife

नागपूर: वस्तीवरील तरुणीसोबत असलेल्या पतीचा अनैतिक संबंधाचा भांडाफोड झाल्याचे कळताच संतप्त पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. व्हेलेंटाईन डे लाच हत्या झाल्याची घटना घडली आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. आणि त्याचदिवशी तिचा वाढदिवस होता. पत्नीची हत्या करून पती पसार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

दीप्ती अरविंद नागमोती वय २६ असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अरविंद अशोक नागमोती वय ३० रा. भीमनगर, इसासनी असे आरोपी पतीचे नाव आहे.

अरविंदचे लग्न होण्याअगोदरच वस्तीतील एका युवतीशी अनैतिक संबंध होते. या युवतीबरोबर लग्न करण्याचा अरविंदने निर्णय घेतला होता. मात्र आई वडिलांनी विरोध केल्यामुळे नाईलाजास्तव दिप्तीशी लग्न केले होते. सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले. दहा बारा दिवसांनी अरविंदने दीप्तीपासून दूर राहणे सुरु केले. तो घरी असताना तासानतास फोनवर बोलत असे दीप्तीने विचारले असता मैत्रीण असल्याचे सांगत होता. मात्र त्याच्या बोलण्यावर दीप्तीला संशय होता.

शनिवारी १३ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी अरविंद त्या युवतीशी बोलत होता. बराच वेळ झाल्यानंतर दीप्तीने पतीला झोपण्यासाठी म्हंटले असता त्याने तिला टाळून तिच्याशी फोनवर बोलत राहिला. तिने त्या रात्री दोघांतील मोबाईलवरील बोलणे ऐकले. पतीचे त्या युवतीशी अनैतिक संबंध असल्याचे समजले. रविवारी १४ फेब्रुवारीला दीप्तीचा वाढदिवस होता. दीप्तीच्या भावाने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी फोन केला असता दीप्तीने भावाला अनैतिक संबंधाबाबत माहिती दिली. हे संभाषण अरविंदने ऐकल्यानंतर तो संतापून दीप्तीला शिवीगाळ केली. काही वेळानंतर शुभमने फोन केला असता ती उत्तर देत नव्हती अरविंदसुद्धा फोन उचलत नव्हता. त्यामुळे काहीतरी घडल्याचा संशय आल्याने अरविंदचे वडील तेथे आले असता दीप्तीचा मृतदेह पलंगावर पडलेला दिसला. शुभमच्या तक्रारीवरून अरविंदविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद हा फरार झाला आहे.

Web Title: Valentine’s Day bribe for girlfriend killed wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here