Home अहमदनगर नगर पुणे महामार्गावर तरुणास लुटले, एक लाखाचा माल लुटला

नगर पुणे महामार्गावर तरुणास लुटले, एक लाखाचा माल लुटला

Parner Young man robbed on Nagar Pune highway

अहमदनगर | Parner: मोटारसायकलवर मुंबईकडे जाणाऱ्या तरुणास नगर पुणे महामार्गावर चास परिसरात चार चोरट्यांनी अडवून लुटले आहे. यात जवळपास १ लाख १० हजाराचा मुद्देमाल लुटला आहे.

याबाबत हेमंत भालचंद्र तिकोणे (वय २९,. रा. पारनेर) याने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तिकोणे यांच्या फिर्यादीनुसार ५ ऑक्टोबरला पल्सर बाईक वरती भिंगार येथून नगर पुणे रोडने मुंबईकडे जात होतो.  सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चास शिवारात एका अनोळखी व्यक्तीने हात केला तेव्हा तिकोणे याने मोटारसायकल थांबविली. त्याचवेळी आणखी तिघे जण मोटारसायकलवर आले त्यांनी तिकोणे यांची कॉलर धरून शेतात ओढत नेले. त्यांनी मारहाण करून खिशातील रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटून पसार झाले. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Parner Young man robbed on Nagar Pune highway Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here