Home अहमदनगर मांत्रिकाने जादूटोणा करत दुकानदाराला पावणे दोन लाखाला मारला गंडा

मांत्रिकाने जादूटोणा करत दुकानदाराला पावणे दोन लाखाला मारला गंडा

Pathardi cheated two lakh shopkeepers for practicing witchcraft

पाथर्डी: दुकानातील ग्राहक वाढविणे, पितृदोष कमी करणे यासाठी पुजाऱ्याने पूजा करून १ लाख ९० हजार रुपये उकळल्याने पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मढी देवस्थानाचे पुजारी अर्जुन रावसाहेब मरकड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रवींद्र रघुनाथ मरकड यांचे मढी येथे किराणा माल व प्रसादाचे दुकान आहे. दुकान धंद्यात बरकत येण्यासाठी व मुलबाळ होण्यासाठी कानिफनाथ देवस्थानचा पुजारी अर्जुन रावसाहेब मरकड याने पूजा बांधली.

लिंबू, काळी बाहुली भारून अमावास्या दिवशी दुकानात मोठी पूजा केली. त्यासाठी रवींद्र मरकड यांच्याकडून १ लाख ९० हजार रुपये घेतले. मात्र तरीही दुकान चालत नसल्याने पितृदोष असल्याचे सांगितले. यासाठी जादूटोणा करण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Pathardi cheated two lakh shopkeepers for practicing witchcraft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here