लोखंडी गजाने मारहाण करत तरुणाला लुटले
अहमदनगर | Ahmednagar: नगर तालुक्यातील सांडवे फाटा येथे एका तरुणाला रस्त्यात अडवून लोखंडी गजाने मारहाण करत त्याच्याजवळ असलेलीं रोख रक्कम ४८ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेऊन फरार झाले. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परवेज गुलाब सय्यद वय ३१ रा. चिंचोडी पाटील ता, नगर असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सद्दाम बबड्या सय्यद, बबड्या महमूद सय्यद, धर्मा तिखे, रशीद मेहमूद सय्यद, बिलाल बबड्या सय्यद, युसुफ राजुमिया सय्यद रा. सर्व चिंचोडी पाटील ता, नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar beat the young man with an iron rod and robbed