Home अहमदनगर तरुण महिलेचा विनयभंग व मारहाण, गुन्हा दाखल

तरुण महिलेचा विनयभंग व मारहाण, गुन्हा दाखल

Nevasa Young woman molested and beaten

नेवासा | Nevasa: नेवासा तालुक्यातील देवगाव येथील ३० वर्षीय तरुण महिलेचा विनयभंग करून तिच्या मुलास मारहाण करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणी ही घरासमोर उभी असताना तिच्या मुलास शिवीगाळ करण्यात आली तसेच धक्काबुकी करून मारहाण करण्यात आली. तसेच आरोपींनी मिठी मारून तिला खाली पाडण्यात आले. तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग करण्यात आला. तुला काय करायचे ते कर अशी धमकी देत निघून गेले.

याप्रकरणी पिडीत तरुणीने नेवासा पोलीस स्टेशनाला फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून देवगाव आरोपी कचरू पंढरीनाथ कदम, इंदुबाई कचरू कदम, विक्रम अशोक नवले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक काळे हे अधिक तपास करीत आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Nevasa Young woman molested and beaten

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here