Home अहमदनगर हॉटेल समोर गाडी लावू नको सांगितल्याच्या रागातून माजी सैनिकास मारहाणीत मृत्यू

हॉटेल समोर गाडी लावू नको सांगितल्याच्या रागातून माजी सैनिकास मारहाणीत मृत्यू

Pathardi Ex-soldier beaten to death

पाथर्डी: हॉटेलसमोर चार चाकी लावू नको असे सांगितल्याच्या रागातून फुंदे टाकळी फाट्यावर आठ ते नऊ लोकांनी केलेल्या मारहाणीत माजी सैनिक विश्वनाथ कारभारी फुंदे रा, फुंदे टाकळी यांचा मृत्यू झाला आहे. टाकळी फाट्यावर ही घटना घडली.

याबाबत मृताचे भाऊ मच्छिंद्र कारभारी फुंदे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार मयत विश्वनाथ फुंदे यांचे फुंदे टाकळी फाट्यावर साई प्रेम नावाचे हॉटेल आहे. शुक्रवारी ८ वाजून २० मिनिटांच्या सुमारास संशियीत आरोपी सुधीर संभाजी शिरसाठ याने फुंदे यांच्या होटेलसमोर चार चाकी गाडी लावली, हॉटेलच्या दारात गाडी लावू नका अशी विनंती फुंदे यांनी केली. यावरून शिरसाठ यांनी फुंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व सहकाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले. तीन मोटारसायकलवर आलेल्या सात ते आठ अनोळखी लोकांनी व शिरसाठ याने लोखंडी पाईप रॉड व लाथाबुक्क्यांनी फुंदे यांना मारहाण केली. सोडवण्यासाठी गेलेला शिरसाठ यांचा भाचा अशोक खेडकर यालाही मारहाण केली. शिरसाठ व त्याच्या सहकाऱ्यांनी फुंदे यांना गाडीत घालून पाथर्डी येथे आणले. शहरातील श्रीतीलोक विद्यालयाच्या पाठीमागील प्रांगणात पुन्हा एकदा केली. पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी जाऊ नये यासाठी आरोपींनी फुंदे यांना दारू पाजली. यामध्ये फुंदे हे गंभीर जखमी झाले. त्यांना पाथर्डीच्या उप जिल्हा रुग्नालायात दाखल केले. नंतर त्यांना अहमदनगर येथे हलविले मात्र त्यांचा मृत्यू झाला. मयताचे भाऊ यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात सुधीर शिरसाठ व अनोळखी सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Pathardi Ex-soldier beaten to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here