Home अहमदनगर चोरट्यांचा गावठी कट्ट्यातून गोळीबार: दोन ग्रामस्थ जखमी

चोरट्यांचा गावठी कट्ट्यातून गोळीबार: दोन ग्रामस्थ जखमी

Karjat Theft Thieves fired from a village

कर्जत: तालुक्यातील निंबोडी या गावात चोरट्यांनी गावठी कट्यातून केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली.

चोरटे शेळी चोरून घेऊन जात असताना हा गोळीबार केला. खंडू गरड वय ५० व भरत बर्डे अशी या जखमींची नावे आहेत.

निंबोळी गावात रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तिघा चोरांनी दुचाकीहून प्रदीप गरड यांची शेळी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी गरड यांना जाग आली. दुचाकीवरून चोरटे शेळी घेऊन जात आल्याचे लक्षात येताच गरड यांनी आरडाओरडा केला. नातेवाईक जागे झाले. चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली. ग्रामस्थांनी सहा जणांनी पाठलाग सुरु केला. यातील बापूसाहेब गरड यांनी तिघा चोरांपैकी मागे बसलेल्या चोराला पकडले.यांच्यात झटापट झाली. तो चोर निसटला.गावकऱ्यांनी पाठलाग सुरूच ठेवला. गावातून मोठा जमाव येत असल्याचे पाहताच दुचाकीवर मध्यभागी बसलेल्या चोराने गावठी कट्ट्यातून पाठलाग करणाऱ्या दोघांवर गोळीबार केला. खंडू गरड यांच्या बरगडीला गोळी लागली तर भरत बर्डे यांच्या कानाला चाटून गोळी गेली. यात ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात  नेण्यात आले. मात्र चोरांनी दुचाकीवरून पोबारा केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर जाधव घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी दोन जिवंत काडतुसे आढळून आले. बापूराव गरड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Karjat Theft Thieves fired from a village

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here