Home पाथर्डी उस तोड कामगारांचा टेम्पो पलटी, बैलाचा मृत्यू

उस तोड कामगारांचा टेम्पो पलटी, बैलाचा मृत्यू

Pathardi tempo of those workers changed

पाथर्डी | Pathardi: साखर कारखान्यावर ऊस तोड कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो चा अपघात झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडे आकरा वाजता पाथर्डी तालुक्यातील करोडी येथे घडली. या अपघातात टेम्पोमध्ये असलेल्या बैलाचा जागेवरच मृत्यू झाला तर एक बैल जखमी झाला आहे. यामध्ये ऊस कामगार देखील जखमी झाला आहे.

बाळू रुपनर हे रुपनरवाडी येथील रहिवासी आहेत. ते पुणे जिल्ह्यातील विघ्नहर साखर कारखान्याला जात असताना त्यांचा टेम्पो पलटी झाला. या टेम्पोत असणाऱ्या दोन बैलामधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या बैलाचे शिंग मोडले आहे टेम्पोत असलेले कामगार बाळू व त्यांचा मुलगा देखील जखमी झाला आहे. पत्नीचा हात देखील मोडला आहे. या अपघातात उस तोड कामगाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या कामगाराला मुकादम व साखर कारखाना यांच्या मदतीची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Pathardi tempo of those workers changed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here