Home अहमदनगर लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर भक्तनिवासात नेऊन अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर भक्तनिवासात नेऊन अत्याचार

Pathardi Torture by taking a young woman to a Bhaktaniwas 

पाथर्डी: लग्नाचे आमिष दाखवून एका २० वर्षीय तरुणीवर देवस्थानच्या भक्तनिवासात नेऊन अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच याप्रकरणी कोणाला काही सांगितल्यास तुला जीवे ठार मारून टाकण्याची धमकी देण्यात आली.

याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून अशोक मोहिते याच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अशोक अण्णा मोहिते याच्याविरुद्ध बलात्कारचा गुन्हा दाखल केला असून आरोपी मोहितेला अटक केली आहे.  याबाबत अधिक वृत्त असे की, पाथर्डी येथील एका २० वर्षीय तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवले आणि एका देवस्थानच्या भक्त निवासात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

याबाबत कोणाला सांगितल्यास तुला जीवे ठार मारीन अशी धमकी देण्यात आली. इंदिरानगर भागातील एका २० वर्षीय तरुणीला डिसेंबर २०१९ मध्ये भक्त निवासात घेऊन जाऊन अत्याचार करण्यात आला. तुझे लग्न कोणाशी होऊ देणार नाही.हे कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या कुटुंबातील व्यक्तीना ठार मारीन अशी धमकी दिली. पिडीत तरुणीने दि. १७ डिसेंबर २०२० रोजी पोलिसांत तक्रार दिल्याने मोहिते याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करीत आहेत.

Web Title: Pathardi Torture by taking a young woman to a Bhaktaniwas 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here