Home अहमदनगर महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांच्या वडिलांचा अपघातात मृत्यू

महसूल उपायुक्त गोरक्ष गाडीलकर यांच्या वडिलांचा अपघातात मृत्यू

Palave Goraksh Gadilkar's father dies in an accident

पळवे: पारनेर तालुक्यातील पळवे वस्ती नगर पुणे महामार्गावर पुणेहून नगरकडे भरधाव वेगाने जात असणाऱ्या क्रेटा गाडीने ह.भ.प. महादेव भाऊसाहेब गाडीलकर वय ८५ यांना जोराची धडक दिल्याने अपघात घडला. यामध्ये  गाडीलकर यांचा मृत्यू झाला आहे.

हा पघात सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रामदास तरटे यांनी फिर्याद दिली असून यावरून  सुपा पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 ह.भ.प. महादेव भाऊसाहेब गाडीलकर हे वारकरी संप्रदायात अग्रगण्य असल्याने पळवे गावावर शोककळा पसरली आहे, ते गोरक्षनाथ महादेव गाडीलकर (उपविभागीय महसूल उपयुक्त नाशिक ) यांचे वडील होते. मठवस्ती येथे सतत पायी चालणाऱ्यांची आवक जावक असते. वाहनांना मोठा वेग असतो. यामुळे या भागात दोन्ही बाजूनी गतिरोधक करावेत अशी मागणी रामदास तरटे यांनी केली आहे/ अधिक तपास सहायक फौजदार डी. बी. शेरकर हे करीत आहेत.

Web Title: Palave Goraksh Gadilkar’s father dies in an accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here